बीड

बीडमधील तोतया पोलीस गजाआड

अमिश देऊन महिलेबरोबर ठेवले शारीरीक संबध

6 March :- बीड येथील हिवरापहाडी येथील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महीलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होवून मैत्री केली.तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो दाखवत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी ओळख वाढविली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

तुला पोलीस भरतीत मदत करतो, तु नवऱ्याला सोडून, दे माझ्याशी लग्न कर असे सांगून तिच्याशी शारीरीक संबध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर राहाता पोलीसात महिलेने फिर्याद दिली.

तिची फिर्याद नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झाड झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीसाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.