बीड

बीड जिल्ह्यात आज कोरोनाची शतकीय खेळी!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

6 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे.

आज शनीवारी दिनांक 6 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 994 अहवालात तब्बल 108 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात बीडमधील सर्वाधिक 43 रुग्णांचा समावेश आहे.

यासोबत अंबाजोगाई- 8, आष्टी-7, गेवराई-21, केज-4,माजलगाव-8,परळी-8, पाटोदा-5, शिरूर-1 तर वडवणी येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.