राजकारण

पालकमंत्र्यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली- पंकजा मुंडे

आमची सत्ता होती तेव्हा आदर्श कामाची उंची निर्माण झाली होती- पंकजा मुंडे

4 March :- बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याला सतत मान खाली घालावी लागत आहे, अशी बोचरी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. बीडचे अनेक अधिकारी अँटी करप्शच्या जाळ्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्र्यांवर भडकल्या. जिल्ह्यात जेव्हा पाच वर्षे आमची सत्ता होती तेव्हा जिल्ह्यामध्ये एक आदर्श काम आणि कामाची उंची निर्माण झाली होती. आता सध्या या पालकमंत्र्यांच्या सत्तेत अनेक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यामुळे बीड जिल्ह्याला मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका पंकजा यांनी केली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणताच दबाव नाही किंबहुना वचक नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने काम करत आहे. आमची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना धाकाच ठेवायचो पण आता तसं होताना दिसत नाही, असं पंकडा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये भ्रष्टाचारी अधिकारी आणले. त्यांना वेळोवेळी अभय दिले. त्याचमुळे अनेक अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकत आहेत. हे बीडसाठी चांगलं नाही. धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली गेली, असं पंकजा म्हणाल्या.


बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत दोन दिवसांपूर्वी (3 मार्च) रोजी पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.