राज्यात कोरोनाचा आलेख उंचावला; चिंता वाढवणारी रुग्णसंख्या आली समोर!
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
4 March :- राज्यात कोरोनाचा वाढता कहर पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनत चालला आहे. नागरिक कोरोना विषयक नियमांची पायमल्ली करून बिनधास्तपणे सर्वत्र फिरताना दिसत आहे. मास्क न वापरता सोशल डिस्टन्सचा ठिकठिकाणी उडणारा फज्जा कोरोना संक्रमण वाढवत आहे. महाराष्ट्रात आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२% एवढे झाले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८८,८३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.