बीड

बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे नवे आदेश

वाचा काय राहणार बंद आणि काय सुरू

5 March :- बीड जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात य बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील आठवडी बाजार, यात्रा बंद करण्यात आल्या असून खाजगी कोचिंग क्लासेस देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत.

सार्वजनिक स्वरूपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येत आहेत. खाजगी कोचिंग क्लासेस, यात्रा, आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.शहरी भागात कंटेनमेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार.