पोपटशेट कोटेचा यांना पत्नीशोक छायाबाई कोटेचा यांचे निधन
बीड, : येथील लोखंडाचे प्रसिध्द व्यापारी पोपटशेट कोटेचा यांच्या पत्नी सौ. छायाबाई कोटेचा यांचे गुरूवारी सायंकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते, त्या अत्यंत शांत, धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या, त्यांच्या आज दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता सावता माळी चौकातील आकाश अर्पामंेंट परिसरातून अंत्ययात्रा निघणार असून अमरधाम स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन सुना, नावतंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. कोटेचा यांच्या दु:खात झुंजार नेता परिवार सहभागी आहे.