बीड

आजही रुग्णवाढीत मोठी भर; ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची बाधा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

4 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आजही बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने पन्नाशी पार केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज गुरुवारी दिनांक 4 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 890 अहवालात 57 रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात बीडमधील 22 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 11, आष्टी-9, गेवराई-3, केज-2,माजलगाव-3,परळी-3, पाटोदा-1 तर शिरूर येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.