सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे अनुराग आणि तापसीची 38 तासांपासून चौकशी आहे सुरु

इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु

4 March :- चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप हे सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधे थांबलेले असताना तिथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मिडीया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झालाय त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशेब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याच इनकम टॅक्स विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटंल आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये आणि त्यांच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये 350 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचेही इनकम टॅक्स विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. त्याचबरोबर तापसी पन्नुच्या घरातून पाच कोटी रुपयांच्या रोख रकमेची पावती देखील सापडलीय. त्याचबरोबर या दोघांच्या कंपन्यांनी दाखवलेल्या खर्चापैकी वीस कोटी रुपयांचा खर्च हा बोगस आढळून आलाय असंही इनकम टॅक्स विभागाने म्हटलंय. याशिवाय या दोघांकडून आणि त्यांच्या कार्यालयातून ई-मेल, वॉट्सअॅप आणि लॅपटॉप – कम्प्युटर्सच्या हार्ड डिस्कमधून मोठ्या प्रमाणात डेटा देखील ताब्यात घेण्यात आला आहे.

या दोघांचे सात बॅंक लॉकर्स देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. आयकर विभाग (IT)ने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपसह इतर सेलिब्रिटी राहत असलेल्या ठिकाणी आज सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान, चौकशीमध्ये काही लॉकर्सबाबत माहिती मिळाली आहे. हे लॉकर्स आयकर विभागाने सील केले आहेत. या कारवाई केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने म्हटलं आहे की, 300 कोटी रुपयांच्या संशयीत रकमेबाबत तापसी आणि अनुराग दोघेही उत्तर देऊ शकले नाहीत. सीबीडीटीने म्हटलं की, पाच कोटींच्या रकमेची देवाण-घेवाण आणि 20 कोटी रुपांच्या बोगस देवाण-घेवाणीचीही माहिती मिळाली आहे. सीबीडीटीने सांगितलं की, आयकर विभागाने तीन मार्चला मुंबईमध्ये दोन अग्रणी प्रोडक्शन कंपन्या, एक अभिनेत्री आणि दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या परिसरात छापेमारी केली.

सर्च ऑपरेशन पुणे, दिल्ली आणि हैदराबादमध्येही सुरु होतं.सीबीडीटीने सांगितलं की, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सच्या देवाण-घेवाणीत झालेल्या फेरफारी संबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. 350 कोटी रुपयांच्या टॅक्समध्ये गडबड झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्टही मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, ही छापेमारी फँटम फिल्म्सच्या विरोधात कर चोरीचा तपासाचा एक हिस्सा आहे. त्यांनी सांगितलं की, ही छापेमारी 30 ठिकाणांवर करण्यात आली आहे. दरम्यान, फँटम फिल्म्स प्रोडक्शन हाऊस 2018 नंतर बंद करण्यात आलं होतं. यामध्ये याचे तत्कालीन प्रचारक अनुराग कश्यप, निर्देशक-निर्माता विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल आणि निर्माता-वितरक मधु मंटेना यांचा समावेश होता.