पूजा चव्हाणच्या वडिलांची परळी पोलिसांकडे धाव
गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
2 March :- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला होता.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली होती . हा आरोप बदनामीकारक आणि बेछुट आहे.
हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आज त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.