बीडमध्ये कोरोनाचा वाढता कहर चिंताजनक; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
1 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सातत्याने वाढनारी संख्या चिंताजनक आहे. आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत पन्नशीच्या पुढे वाढ झाली आहे. आज सोमवारी दि. 1 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 794 अहवालात 52 रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
यात बीडमधील 17 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 10, आष्टी-3, धारूर-1,गेवराई-6, केज-2,माजलगाव-7,परळी- 4 तर पाटोदा येथे पण 1 रुग्ण आढळून आला आहे तर आज जिल्ह्यातून 48 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती भेटली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.