राज्यात कोरोनाचा वाढता कहर चिंताजनक, वाचा सविस्तर
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
28 Feb :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज 28 फेब्रुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 3753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे घरी परतले आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 008 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.