महाराष्ट्र

खळबळजनक! जेवण न दिल्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्ण थेट रस्त्यावर

औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची जेवणासाठी रस्त्यावर शोधाशोध

27 Feb :- सध्या राज्यभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत जेवण न दिल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोरोना झालेल्या रुग्णांचा आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मात्र या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत जेवण न दिल्याने मोठा गोंधळ समोर आली आहे. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला असून ज्यामधून रुग्ण गेटबाहेर पडताना दिसत आहेत. कोविड सेंटरमध्ये जेवण न दिल्यामुळे रुग्णांनी थेट रस्त्यावर येऊन जेवणासाठी शोधाशोध सुरू केल्याचं समोर आलं आहे.

औरंगाबाद महापालिकेकडून कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी जेवणाची सोय करण्यात येते. मात्र आज त्यांना जेवण मिळालं नसल्यानं संतप्त रुग्णांनी सेंटरचे गेट उघडून बाहेर पडले. ही घटना शुक्रवारी घडली. औरंगाबाद शहरातील किल्ले अर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या 247 रुग्णांना महापालिकेकडून वेळेत जेवण मिळाले नाही. म्हणून संतप्त रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे.

सुरुवातीला सेंटर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना सुरक्षा रक्षकाने अडवलं. मात्र तरीही रुग्ण ऐकत नव्हते. अशात मोठ्या संख्येने रुग्ण गेटबाहेर पडले. रस्त्यावर जाऊन जेवणासाठी काही मिळेल का याची शोधाशोध सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे कोरोना पसरू नये म्हणून कडक निर्बंध लावले जात आहेत, मात्र दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच मोठ्या प्रमाणात रुग्ण रस्त्यावर पडल्याचं दिसत आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे.