भारत

‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय

27 Feb :- कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमासेवा 31 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.