बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ; आजची रुग्णसंख्या धाकधूक वाढवणारी

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

27 Feb :- बीड जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा समोर येत आहे. बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज शनिवारी दि. 27 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 779 अहवालात तब्बल 77 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गेवराईमध्ये सर्वाधिक 34 रुग्ण आढळले आहेत तर बीड शहरात 11 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.