सिनेमा,मनोरंजन

अभिनेत्री आमिषावर आर्थिक फसवणूकीचे आरोप; प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात

चित्रपट निर्मितीच्या नावाखाली घेतले होते 2 कोटी 50 लाख रुपये

26 Feb :- कहोना प्यार है या सुपरहिट चित्रपटतातून हिंदी चित्रपट सृष्टीत दमदार पदार्पण करून सिने रसिकांना आलप्या मनमोहक अदाकारीने भुरळ घालणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या मोठ्या अडचणीत अडकली आहे. तिच्यावर आर्थिक फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. झारखंडमधील एका व्यावसायिकाकडून तिनं चित्रपट निर्मितीच्या नावाखाली 2 कोटी 50 लाख रुपये घेतले होते. परंतु तिने हे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. शिवाय तिनं दिलेला चेक देखील बाऊंस झाला असा आरोप अमिषावर करण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सध्या हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आनंद सेन यांनी केली. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं न्यायाधीशांनी त्यांच्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणी दरम्यान अमिषानं तिच्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यामुळे न्यायाधीशांनी तिला पुरावे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवाय हे प्रकरण मध्यस्थी करुन सोडवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.

अमिषाच्या कंपनीचं नाव लव्हली वर्ल्ड एंटरटेन्मेंट देसी मॅजिक असं आहे. ही कंपनीला चित्रपट निर्मितीसाठी अजय कुमार सिंह नामक एका व्यावसायिकानं अडिच कोटी रुपये दिले होते. याबदल्यात त्याला चित्रपटाच्या एकूण नफ्यापैकी काही भाग मिलणार होता. परंतु गेली तीन वर्ष या कंपनीनं कुठल्याची चित्रपटाची निर्मिती केली नाही. त्यामुळे संतापलेल्या अजयनं आपले पैसे परत मागितले. परंतु अमिषाने मात्र पैसे परत करण्यास नकार दिला. शिवाय त्याला मिळालेला चेक देखील बाऊंस झाला. असा आरोप त्याने अमिषाविरोधात केला आहे. यापूर्वी देखील एका व्यावसायिकानं अमिषावर आर्थिक फसवणूकीचे आरोप केले होते.