बीड

बीडमध्ये आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

26 Feb :- बीड जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा समोर येत आहे. रोजच्या तुलनेत आज कोरोना चाचण्या अधिक प्रमाणात झाल्या आहेत तर आजही बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने पन्नाशी ओलांडली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज शुक्रवारी दि. २६ रोजी आरोग्य विभागाच्या संशयित 872 अहवालात 51 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीडमधील 22 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 9, आष्टी-5, गेवराई-1, केज-4,माजलगाव-4,परळी- 2, पाटोदा-1, आणि शिरूर येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.