बीड

सर्वकाही उघडे,याचा अर्थ कोरोना संपला असं नाही!

दोन महिन्यां पासून बंद असलेल्या बीड शहरामध्ये काही गोष्टी सोडल्या तर आज भरपूर काही काही उघडले दिसत आहे कारण यापेक्षा जास्त दिवस आता आयुष्य घरात बंदिस्त राहू शकत नाही म्हणूनच कदाचित प्रशासनाने काही कालावधी करिता शिथिल वेळ वाढवली आहे.दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस ओसाड पडलेले बीड शहर उघडलेले दिसत आहे.जीवनवश्यक गोष्टींसाठी म्हणा वा अन्य काही कारणांसाठी म्हणा दोन पैसे कमवण्या करीत स्वाभिमानी माणूस घराबाहेर पडला आहे त्यामुळे सर्व मार्केट उघडे दिसत आहे. सोबतीची जिवाभाची माणसं,मित्र आज भेटत आहे सर्व काही पहिल्या सारखं वाटू लागले आहे पण….पण याचा अर्थ कोरोना पूर्णतः नष्ट झाला असं नाही पूर्णतः सोडा पण किंचितही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही.
आपल्या कुटुंबाच्या वाढणाऱ्या आर्थिक अडचणींचा विचार करत प्रशासनाने शिथिल वेळ वाढवली आहे त्यामुळे सगळे काही उघडे दिसत असले तरी विनाकारण बाहेर जाणे टाळा,विनाकारण मित्रांना-नातेवाईकांना भेटणे घरी बोलावणे टाळा,घराबाहेर आल्यास खबदारीने वागणे अजूनही आवश्यक आहे,मास्क,सॅनिटाइजरचा वापर चुकूनही विसरू नका,गर्दी करू नका किंवा विनाकारण गर्दी मध्ये जाऊ नका सोशल डिस्टन्स ठेवा,आपल्या पासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या शक्य होईल तितके घरातच थांबा.
“कोरोना विषाणू वर उपाय निघालेला नाही पण खबरदारी हा सर्वात मोठा उपाय आहे हे विसरू नका”