राजकारण

भीषण अपघातात भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांची बहीण, भाऊजी जागीच ठार

गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ झाला भीषण अपघात

24 Feb बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि भाऊजी जागीच ठार झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील चकलाबा तींतरवनी च्या दरम्यान मातोरी येथे आज सायंकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते.

तीतरवणी येथे ही चारचाकी गाडी भरधाव वेगात असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला,यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता