बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा ‘नवा’ आदेश!
10 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
24 Feb :- राज्याच्या अनेक भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही या संदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दि. २४ रोजी मोठा आणि महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून बीड जिल्ह्यामध्येही इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा,महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात यावे ‘तसा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकार्यांना काही वेळेपूर्वीच दिला होता.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा, महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज बुधवारी दि. 24 रोजी दिले आहेत. ही बंदी 10 मार्च 2021 पर्यंत असेल असे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.