बीड

बीड- शाळा,महाविद्यालये बंद करण्याबाबत आजीत कुंभार यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

24 Feb :- राज्याच्या अनेक भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही या संदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आज दि. २४ रोजी मोठा आणि महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून बीड जिल्ह्यामध्येही इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा,महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात यावे ‘तसा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकार्यांना दिला आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे पालकांचे आणि शिक्षण संस्थांचे लक्ष लागले आहे.