बीड

आजही कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर, वाचा सविस्तर!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

23 Feb :- बीड जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा समोर येत आहे. कोरोना चाचण्यांनुसार सरासरी आता रुग्ण संख्येत मोठी भर पडत आहे. यामुळे निश्चितच कोरोनाने युटर्न घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज मंगळवारी दि. २३ रोजी आरोग्य विभागाच्या 603 संशयित अहवालात 47 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीडमधील 23 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाईत 12, आष्टी-1, धारूर-२,गेवराई-3, केज-3, परळी- २, वडवणी येथे १ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.