सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करला झाला कमी वयात ‘हा’ आजार
आजारपणाविषयी नेहाने स्वतः केला खुलासा
23 Feb :- नेहा कक्कर हे नाव साऱ्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. सध्या नेहा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १२’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून याच मंचावर तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. लवकरच या शोमध्ये आईवर आधारित खास भाग होणार आहे. यात नेहा तिच्या आजारपणाविषयी सांगताना दिसत आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं. तिचं हे गाणं ऐकताना नेहा भावूक झाली.
यावेळी नेहाने तिला एंक्झायटीचा त्रास असल्याचं सांगितलं. दरम्यान, नेहा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. अनेकदा नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते. अलिकडेच नेहाने रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा हा कलाविश्वात चांगलाच चर्चेत राहिला होता.