बीड

‘ताराहर फिल्म स्टुडिओचा’ कलावंतांसाठी ‘स्तुत्य’ उपक्रम

सेवालाल जयंती निमित्त ताराहर फिल्म स्टुडिओच्या वतीने विविध उपक्रम

22 Feb :- गेवराई येथील ताराहर फिल्म स्टुडिओ ने अल्पवधीतच कलाक्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेवराईमध्ये गेल्या काही वर्षांपासून ताराहर स्टुडिओचे संचालक तथा नृत्यशिक्षक रोहित ताराहर यांच्या संकल्पनेतून कलाक्षेत्रात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या कलावंतांसाठी अनेक यशस्वी उपक्रम उभी राहिले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

चित्रपट अभिनय शिबीर, नृत्य शिबीर, अल्बम निर्मिती, दैनंदिन नृत्याचे क्लासेस असे अनेक कलावंतासाठी उपयोगी आणि यशस्वी उपक्रम ताराहर फिल्म स्टुडिओने याअगोदर राबलवली आहेत आणि अजूनही राबवत आहे. याचबरोबर ताराहर फिल्म स्टुडिओच्या माध्यमातून अनेक कलावंत चित्रपटांमध्ये देखील झळकली आहेत. 15 फेब्रूवारी सतगूरू संत सेवालाल महाराज यांच्या 282 जयंती निमीत्त महाराजांना शिरा व भात याचा भोग (प्रसाद) देऊन भेंडटाकळी तांडा येथे जयंती साजरा करण्यात आली.

यावेळी बंजारा समाजातील तसेच बंजारा कलावंतांना एक ओळख निर्माण व्हावी म्हणून ताराहर बहद्देशिय सेवाभावी संस्था याने तांड्यातील कलावंतांना प्रमाणपत्र व आय डी कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबू जाधव,अर्जुन राठोड, अनुसया राठोड,मिरा राठोड, मनोहर राठोड, बायनाबाई राठोड, पापा चव्हाण, तारामती चव्हाण, हेमाबाई राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान ग्रामीण भागात तांड्या तांड्यावर एक चळवळ उभी राहावी या हेतूने आपण या संस्थेच्या माध्यमातून असे सामाजिक काम करत राहणार असल्याचे ताराहर स्टुडिओचे संचालक रोहित ताराहर यांनी सांगितले.