बीड जिल्ह्यात कोरोनाच कहर सुरूच; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
22 Feb :- बीड जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा समोर येत आहे. कोरोना चाचण्यांनुसार सरासरी आता रुग्ण संख्येत मोठी भर पडत आहे. यामुळे निश्चितच कोरोनाने युटर्न घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
आज सोमवारी दि. २२ रोजी आरोग्य विभागाच्या 431 संशयित अहवालात 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीडमधील 12 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाईत 17, गेवराई-1, परळी- 2, शिरूर-3, धारूर 1, केज -3, रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.