बीड

संस्कार विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ‘मोरेश्वर वैद्य’ यांचे अपघाती निधन

बीडहून औरंगाबादकडे जात असताना झळा अपघात

21 Feb :- दररोज एकापाठोपाठ घडणाऱ्या भीषण अपघाताच्या घटना ऐकून आणि वाचून जणू अपघाताचे सत्रच सुरु झाले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बीड शहरातील संस्कार विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोरेश्वर वैद्य यांचा दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री बीडहून औरंगाबादकडे जात असताना रात्री साधारणता पावणेबाराच्या सुमारास गतिरोधकावरती गाडी आदळून भीषण अपघात झाला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अपघात स्थळी सरांसोबत मुलगी जावई व नात हे होते त्यांनाही मुका मार लागलेला आहे तर जावयावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 63 वर्षाचे होते. संस्कार विद्यालयातील कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय मुख्याद्यापक म्हणून वैद्य सरांची विशेष ओळख निर्माण झालेली होती.

शैक्षणिक कार्यासोबतच संस्कार गृहनिर्माण संस्था व संस्कार कर्मचारी पतसंस्था स्थापन करण्यामध्ये सरांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. वैद्य सरांच्या अपघाती निधनामुळे बीड शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. वैद्य सरांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण झुंजार नेता परिवार सहभागी आहे.