क्राईम

१६ वर्षीय मुलीचा विनयभंग

माजलगाव:- तालुक्यातील दिंद्रुड येथे १६ वर्षीय मुलीला तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर, मला एकट्यात येऊन भेट अन्यथा तुझ्या आई-वडिलानां,भावाला जीवे मारून टाकील, तुझ्यावर बळजबरी करिन असं नामदेव महादेव घायतिडक यांच्या सालगड्याचा मुलगा गणेश नेहमी या १६ वर्षीय मुलीला त्रास द्यायचा या गोष्टीला वैतागून मुलीने आपल्या वडिलांना होत असलेल्या त्रासाबाबद सांगितले असता मुलीच्या वडिलांनी गणेशला त्रास का देत आहे विचारले असता गणेशने जातीवाचक शिवीगाळ द्यायला सुरु केली आणि मी त्रास देतच राहणार काय करायचे ते करा असे म्हणून गणेश निघून गेला.घडलेला हा प्रकार मुलीचे वडील महादेव घायतिडक यांना सांगायला गेले त्यावेळी नामदेव घायतिडक,महेश घायतिडक आणि गणेशचे वडील उलट त्यांच्याच अंगावर धावून गेले जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
यामुळे मुलीच्या वडिलांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात ऍट्रासिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दीसले करत आहेत.