बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वेगाने सुरु; आजही रुग्णवाढीत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

21 Feb :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना आज मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा आहे. रोजच्या तुलनेत झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये आज रुग्ण संख्येत मोठी भर पडली आहे. यामुळे निश्चितच कोरोनाने युटर्न घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज रवीवारी दि.२१ रोजी आरोग्य विभागाच्या 419 संशयित अहवालात 53 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीडमधील 16 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाईत 19, आष्टी 1, गेवराई-1, परळीत 5,पाटोदा 1, शिरूर 6, धारूर 1, केजमध्ये -3, रुग्ण आढळून आले आहेत.नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.