भारत

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर अर्थमंत्री यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

20 Feb :- पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हा एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कोणतचं उत्तर देणं योग्य नाही. केंद्र आणि राज्य दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

त्याचसोबत ते म्हणाले की, “ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तेलाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चं तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात.”