बीड

बीडमध्ये प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनच्या हालचालींना वेग?

बीडमध्ये मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची काठी

20 Feb :- राज्यात नियंत्रणात येत असलेल्या कोरोना विषाणूने अचानक युटर्न घेतला आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा आज धाकधूक वाढवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

ठिकठिकाणी तोंडावर मास्क न लावता नागरिकांची जमा होणारी गर्दी, सर्रासपणे सर्वत्र सोशल डिस्टन्सचा उडणारा फज्जा, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषयक नियमावलीचे कुठलेच पालन न करणारे नागरिक, लग्न-समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, वाढदिवस कार्यक्रमांमध्ये नियमावलीला डावलून वाढत असलेली गर्दी यामुळे वाढू लागलेला कोरोना विषाणूचा कहर या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊन बाबतच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठाका झाल्याचे समजते आहे. प्रशासनाने लॉकडाऊनच्या उपयोजना देखील करून ठेवल्या आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या बेशिस्त वागण्यामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे असे प्रसनाकडून आहवान करण्यात आले आहे.

आज बीड शहरात मास्क न वापरता मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. तोंडावर मास्क न लावता फिरणाऱ्यांना आज पोलिसांनी काठीने बदडले आहे असून त्यांच्याकडून २०० ते ५०० रुपयांचा दंड सुद्धा वसूल केला आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे नागरिकांनो तोंडाला मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा, गर्दी टाळा आणि कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करा.अन्यथा प्रशासनाला लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागेल यात शंका नाही.