बीड

बीडमध्ये कोरोनाचा ‘युटर्न’; आज रुग्णसंख्या ‘धाकधकू’ वाढवणारी!

कोरोना चाचण्या कमी, रुग्णसंख्या जास्त

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

20 Feb :- :- राज्यात आटोक्यात येत असलेला कोरोनाचा कहर आता पुन्हा वाढू लागला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना आज मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आकडा बीडकरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा आहे. रोजच्या तुलनेत झालेल्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेमध्ये आज रुग्ण संख्येत मोठी भर पडली आहे. यामुळे निश्चितच कोरोनाने युटर्न घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकणी मास्क न वापरता सोशल डिस्टन्सचा उडवलेला फज्जा, ठिकठिकाणी वाढती गर्दी यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरु केलं आहे. आज शनिवारी दि. २० रोजी आरोग्य विभागाच्या 436 संशयित अहवालात 58 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीडमधील 25 रुग्णांचा समावेश आहे.

यासोबत अंबाजोगाईत 13, आष्टी 3, माजलगाव 3, परळीत 4,पाटोदा 2, शिरूर 2, धारूर 2, केजमध्ये 4 रुग्ण आढळून आले आहेत.नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.