‘या’ भागात गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा
शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा बसणार फटका
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अस्मानी संकट असणार, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कालही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या Heavy Rain In परभणी हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारीला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे.
तसेच, काही प्रमाणात गारपिटीची शक्यताही नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.