मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर
यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर
18 Feb :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. उद्या 19 फेब्रुवारीपासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व आस्थापना, हॉटेल्स दररोज रात्री 8 वाजता बंद होणार आहेत. जलतरण तलाव, इनडोअर गेम पूर्णपणे बंद राहणार आहेत. धार्मिक समारंभाला केवळ 5 व्यक्तींचीच परवानगी असणार आहे. तसेच त्रिसूत्री नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्हातही लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे.
अमरावती जिल्हात रविवारी लॉकडाऊन पाळला जाणार आहे. हा लॉकडाऊन शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन रहाणार आहे. रविवारी जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू राहतील, अशी माहितीही अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.