भारत

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला आरोपीला होणार फाशी

राष्ट्रपतींनीही दया याचिका लावली फेटाळून

18 Feb :- भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव आहे. शबनमने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. याची तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे.

शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने 15 एप्रिल 2008 रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. यामध्ये तिच्या आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता. शबनचे गाव बावनखेडी आहे.

बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, 2008 साली झालेल्या हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. त्यावेळी गावातील अनेक मुलींचे नाव शबनम होते. त्यातील अनेक मुलींचे लग्न झाले आहे. 2008 सालानंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे.