बीड

केंद्रेकरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर ओढले ताशेरे

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आदेश

17 Feb :- बीड-आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे चर्चेत असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला असून यात ते आपल्या विभागातील जिल्हाधिकारी सीईओ आणि पोलीस अधिकारी तसेच मनपा आयुक्त यांच्या कारभारावर ताशेरे ओढत असल्याचे स्पष्ट होत आहे . कोरोना वाढत असून काळजी घ्या,मंगल कार्यालय, कोचिंग क्लास वर छापे टाका,मास्क न वापरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा,बीड, लातूर,नांदेड जिल्हाधिकारी यांनी अधिक काळजी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले आहे .

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सुनील केंद्रेकर यांची ही ऑडिओ क्लिप आठ ते दहा मिनिटांची असून यामध्ये ते म्हणतात की, मला लातूर, बीड आणि नांदेडची काळजी आहे. परभणीच्या सिव्हिलची टेस्टिंग वगैरे फार बोगस आहे. मी त्यावर बिलकूल समाधानी नाही. हिंगोलीचं टेस्टिंग तर अत्यंत पुअर आहे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. ट्रेसिंगकडे लक्ष द्या. त्याच त्या सूचना बोलायला लावू नका. सीईओनी यात पुढे आलं पाहिजे. यात मी म्युनिसिपल कमिशनरलाही जबाबदार धरणार आहे.

बी अलर्ट मशनरी आता पुन्हा टोनिंग करा आणि तुमचा रिस्पॉन्स टोनअप करा. पुन्हा या विषयावर वेगळी व्हिसी घेण्याची माझ्यावर वेळ आणू नका. जर आपण महिना दीड महिना टाईट राहिलो तर माझा अंदाज आहे की, बाय जून जर आपल्या स्वत:ला वाचवू शकलो तर ठिक नाही तर पुन्हा उन्हाळ्याचे तुमचे सर्व महिने याच तापात जातील. व्हीसी होतील. स्ट्रॅटिक्स होईल, आढावे होतील आणि मग प्रॉब्लेम होतील. ती वेळ येऊ देऊ नका आणि कामाला लागा’, असंही त्यांनी म्हटलं आहे सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा.

जर तिथे बिना मास्कचे आणि अलाऊड संख्येपेक्षा जास्त लोकं असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. फाईन लावला पाहिजे आणि पोलीस केस दाखल करू म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे. सेकंड टाईमला मंगलकार्यालय पुन्हा हाऊस फुल सापडले तर गुन्हा दाखल करा आणि हे मंगल कार्यालय सील करा’, असा आदेशच केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. ‘जे कोचिंग क्लासेस आहेत तिथेही रेड करा. फाईन लावा आणि मुलांनी मास्क लावलेत की नाही पाहा.

सॅनिटाईजेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या. सेकंड टाईम सापडल्यावर कोचिंग क्लासेसला सील कराव्या लागतील. बाकी ज्या क्लोज्ड स्पेसेस आहेत. तिथेही ताबडतोब कारवाई करा. हे अर्जंट आहे. कारण सडनली स्पाईक होईल असं सध्या दिसत आहे.

काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नवीन स्ट्रन आला आहे. ते नाही म्हणत आहेत. पण मला काही ठिकाणी आढळलंय नवीन स्ट्रेन आल्याचं दिसून आलंय. हिंगोली, परभणी कलेक्टरला माझ्या सूचना आहेत की, तुमच्याकडचे मला फिडबॅक येत आहेत. तुमच्या जिल्ह्यात मोठमोठे विवाह सोहळे होत आहेत आणि काहीही कारवाई केली जात नाही. औरंगाबदामध्येही तीच परिस्थिती आहे.