बीड

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बीडमधील 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांची मोठी कारवाई

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

17 Feb :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक जण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे.

पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. या विषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.