बीड

वाचा, किती आढळले जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

17 Feb :- कोरोनावर लस आली जनजागृतीही झाली मात्र कोरोनाच्या आकडेवाढीत रोजच चढ-उतार पाहायला मिळतायत एकूणच कोरोनाच्या नियमांच्या बाबतीत नागरिकांमध्ये उदासीनता पाह्यला मिळत आहे. रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज बुधवारी जिल्ह्यातील 445 संशयितांचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाईत पाठविण्यात आले होते. यात 28 जण बाधित सापडले असून 397 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीड- 4, अंबाजोगाई- 14, केज-1, माजलगाव-3,परळी-5 तर शिरूर तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. रुग्णसंख्येत दिलासादायक घट पडत असली तरी निष्काळजीपणा नको असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.