लाडक्या जावयाला अद्दल घडवण्यासाठी सासूने काढली वरात
बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली चोरीचा गुन्हा दाखल!
17 Feb :- जावयाचा पाहुणचार करताना आपण नेहमी सर्वत्रच पाहतो. जावयाचे मोठ्या प्रमाणात लाड पुरवले जातात मात्र जावयाचे लाड मर्यादा सोडून होत असतील तर जयावयाला धडा शिकवलेल्या अनेक घटना आपण समाजात पाहत असतोत अशीच एक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस कॉलनी येथे राहणाऱ्या सुनीता बंडूराव कांबळे यांची मुलगी हेमा मागील एक वर्षापासून आईकडे राहत आहे. तिचा पती गोपाळ उत्तम कसबे राहणार वानटाकळी हा नेहमी त्यांच्याकडे येत असतो.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गोपाळने आधारकार्ड व इतर कागदपत्रे सासूरवाडीत ठेवली होती. बुधवारी सुनीता आणि कुटंबीय नातेवाईकाच्या लग्नासाठी सातेफळला गेले होते. त्यावेळी गोपाळने सासरे खंडूराव कांबळे यांना फोन केला आणि कागदपत्रे मागितली. त्यांनी ‘घरी आल्यावर देतो’ असे सांगतील. पण गोपाळला आताच कागदपत्र हवी होती. त्यामुळे गोपाळचा पारवारा उरला नाही. संतापलेल्या गोपाळने सासऱ्याचे घरं गाठले आणि कुलुप तोडून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपत्रे आणि रोख रक्कम 20 हजार रूपये चोरून नेले.
घरी परतल्यावर सुनीता कांबळे यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सासू सुनीता कांबळे यांनी जावयाला कायमची अद्दल शिकवण्यासाठी थेट सिरसाळा पोलीस स्टेशन गाठले. सुनीता कांबळे यांनी ठाण्यात फिर्याद दिली.त्यामुळे जावई गोपाळ कसबेवर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. परंतु, लाडक्य जावयावर गुन्हा दाखल झाल्याच्या घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे.
‘नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान!’ या मराठीतल्या म्हणीप्रमाणे जावयाचा पाहुणचार करणाऱ्या सासूनेच लाडक्या जावयावर चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने सासुरवडीत चोरी केल्याचा आरोप सासूने केला आहे. या प्रकरणी सासुच्या फिर्यादीवरून जावया विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.