‘या’ अभिनेत्याला 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक
आज न्यायालयात करण्यात आलं होतं हजर
15 Feb :- सुप्रसिद्ध सिने कलाकार निर्माता आणि व्यावसायिक असलेला सचिन जोशीला ईडीने काल अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सचिन जोशी याला ईडीने अटक केली आहे. ओमकार रिअॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची 18 तास चौकशी करण्यात आली होती. सचिन जोशी आणि ओमकार बिल्डरमध्ये आर्थिक गैरव्यवहाराबाबत अटक करण्यात आली आहे. सचिन जोशी आणि ओंकार समुहामध्ये सुमारे 100 कोटींची अफरातफर झाल्याचा संशय ईडीला आहे. तसेच सचिन जोशी याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. बांधकाम व्यवसायातील प्रतिष्ठीत समूह अशी ओळख असलेल्या ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिन जोशी याची चौकशी इडीचे अधिकारी करत आहेत.
याआधी काही दिवसांपूर्वी ओमकार समुहाच्या तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले. तसेच ओमकार समुहात उच्च पदावर कार्यरत असलेल्या सदस्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. एकाचवेळी ओमकार समुहाशी संबंधित अनेक ठिकाणी छापे पडले होते. ईडीकडून समन्स पाठवण्यात आल्यानंतर सचिन जोशी ईडीसमोर सादर झाला नव्हता. त्यामुळे शनिवारी सचिन जोशीला ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. ओंकार समूहाच्या आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी अजून बडी नावं भविष्यात समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईतील मोठे बिल्डर, बडे सेलिब्रिटी ज्यांनी ओंकार समूहात पैशांची गुंतवणूक केली असेल यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.