बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण

काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा

15 Feb :- कोरोनावर लस आली जनजागृतीही झाली मात्र कोरोनाच्या आकडेवाढीत रोजच चढ-उतार पाहायला मिळतायत एकूणच कोरोनाच्या नियमांच्या बाबतीत नागरिकांमध्ये उदासीनता पाह्यला मिळत आहे. रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज सोमवारी केवळ 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी अंबाजोगाई-4, आष्टी-1, बीड-8, गेवराई- 1,तर पाटोदा येथे 2 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तरी निष्काळजीपणा नको असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.