Popular News

हॉकीचा सुवर्णकाळ काळाच्या पडद्याआड

देशाला तीन वेळा ऑलिंम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे महान खेळाडू बलबीर सिंग सिनिअर यांचे चंदीगड येथे २५ मे रोजी सकाळी निधन झाले. ते ९५वर्षाचे होते.गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बलबीर यांच्या पश्चात मुलगी सुशबीर आणि कंवलबीर, करणबीर, गुरबीर अशी तीन मुले आहेत

आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील १६ महान खेळाडूमध्ये त्यांचा समावेश केला जातो. हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२च्या अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध त्यांनी पाच गोल केले होते. अंतिम सामन्यात पाच गोल करण्याचा त्यांचा विक्रम आजही कायम आहे. १९५७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.