महाराष्ट्र

शिवशाही बस आणि स्कॉपिओचा अपघात

अपघातात सात जण गंभीर जखमी

12 Feb :- नागपुर-पुणे शिवशाही बस व देवदर्शनाहून परत येणार्‍या स्कॉपिओची समोरा-समोर टक्कर होवून झालेल्या अपघातात सात जण जबर जखमी झाले असून स्कॉपिओ चालक व अन्य एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात जालना-औरंगाबाद रोडवरील विशाल कॉर्नरवर रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता झाला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

याा अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की, जुना जालना भागातील देहेडकरवाडी येथील राहणारे कैलास सिताराम शिंदे (38) हे आपल्या संपुर्ण कुटूंबियांसह देवदर्शन आटोपून जालना शहरात येत असतांना जालना शहरातील औरंगाबाद-जालना रस्त्यावरील विशाल कॉर्नरवर रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी नागपुर-पुण्याकडे जाणार्‍या शिवशाही बस क्र. (एमएच-09-ईएम-1976) व स्कॉपिओ क्र.(एमएच-व्ही.जी-6405) समोरा-समोर टक्कर झाली.

यात दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक शाम सुभाष वांगे, चंद्रकांत लक्ष्मण हांडे या दोघांना गंभीर ईजा झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तर कैलास सिताराम शिंदे (38), स्वप्नील कैलास शिेदे (13),रत्नाबाई कैलास शिंदे (35), नितीन कैलास शिंदे (16), चंचल शिंदे (21) यांच्यावर जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलीस नाईक वाघमारे ह्या करीत आहेत.