महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ‘या’ मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच- चित्रा वाघ

12 Feb :- काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर ‘टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. दरम्यान, भाजपनं केलेल्या गंभीर आरोपानंतर एबीपी माझानं मंत्री संजय राठोड यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड आणि त्यांच्या पीएचा आवाज असल्याचा दावा सोशल माध्यमांमधून करण्यात येत आहे.

“पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्यासमोर आलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 10 ते 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते तिची आत्महत्या झाल्यानंतर तिची मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री संजय राठोड त्या माणसाला सांगत आहेत, हे त्या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसेच पोलीस अद्यापही याप्रकरणी स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या कुटुंबियांवर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्दसद विवेकबुद्धी कायम ठेवून गुन्हा दाखल केला पाहिजे.” , असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अशातच सध्या याप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची आणि तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.