बीड

धक्कादायक, बीडमधील खाजगी रुग्णालयाच्या शौचालयात आढळले ‘नवजात अर्भक’

बीड शहरात उडाली खळबळ

11 Feb :- बीड शहरातील जालना रोडवरील एका खाजगी रुग्णालयात आज दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शौचालयामध्ये 3 ते 4 महिन्याचे एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवजात अर्भक मिळाल्याची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सदरील अर्भक पुरुष जातीचे असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. शौचालयामध्ये अर्भक कसे आले…? हे अर्भक कुणाचे आहे…? आशा अनेक चर्चा बीडमध्ये सुरु झाल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान आज एक महिला रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती.बाथरूममधून आल्यानंतर ती महिला परत घरी गेल्याचे रुग्णालयाच्या वतीने हे सांगण्यात आले आहे. पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.