कोरोना बरोबर कसं जगायचं? तज्ज्ञांनी दिला सल्ला
कोरोनापासून दूर राहायचं असेल तर केवळ आणि केवळ खबरदारी घेणं हाच ऐकमेव उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं महत्त्वाचं आहे.सगळं जग सध्या कोरोनामुळे त्रासून गेलं आहे. मात्र अजुही त्यावर कुठलेही औषध मिळालेलं नाही. त्यामुळे कोरोनाला दूर कसं ठेवायचं असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. जगभरचे तज्ज्ञ त्यावर विचार करत आहे. जगभरातल्या अनेक तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी जे सल्ले दिले आहेत.त्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या भाग झाल्या पाहिजेत असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.कोरोना व्हायरसवर औषध नसल्याने केवळ खबरदारी घेणं हेच आपल्या हातात आहे. कोरोनापासून दूर राहायचं असेल तर केवळ आणि केवळ खबरदारी घेणं हाच ऐकमेव उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं महत्त्वाचं आहे
१) सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता – सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे आणि सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वयक्तिक पातळीवर, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या विभागात या गोष्टींसाठी कायम आग्रही असलं पाहिजे. तरच कोरोनाला रोखणं शक्य होणार आहे. कमीत कमी घराबाहेर पडणं हा सर्वात चांगला मार्ग आहे.
२)योग्य आहार – या काळात संतुलीत आणि योग्य आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरी राहिल्यामुळे लोक आवडीटे पदार्थ करत त्यावर ताव मारत आहेत. ही अतिशय चुकीची गोष्ट असून त्यामुळे पचनशक्ती बिघडते त्यामुळे आरोग्याला पुरक, हलकं आणि फायबरयुक्त ताजं अन्न खाणं हेच योग्य आहे.
३)पुरेशी झोप – अनेक लोक झोपेकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. रात्री उशीरा जागणं आणि सकाळी उशीरा उठणं यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. दररोज नियमित 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. त्यामुळे थकवा दूर होतो आणि ताजं तवाणं वाटतं.
४) सकारात्मक रहा – या काळात सगळं वातावरणच नकारात्मक गोष्टींनी भरून गेलं आहे. आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा वातावरणात मानसिक स्वास्थ टिकवून ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण मानसिक स्वास्थ्यावरच सगळ्या गोष्टी आवलंबून आहेत. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करणं, चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, संगित ऐकणं, काही छंद जोपसले असतील तर त्यात मन रमवणं या गोष्टी केल्या तर मानसिक स्वास्थ चांगलं राहू शकतं.
त्यामुळे काळजी घ्या,स्वस्थ राहा, स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला निरोगी ठेवा