‘सुशांत’ मृत्यूप्रकरणी NCB कडून ‘मोठा’ खुलासा
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
11 Feb :- बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात NCB ने बुधवारी आरोपपत्र दाखल करण्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. काही लिंक अद्यापही तपास करत आहेत. एनसीबीच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्याची बाब खरी नसल्याचं सांगितलं आहे. तसंच, ईडीने एनसीबीसह मनी लाँडरिंगच्या चौकशीबाबत क्लोजर रिपोर्ट शेअर केल्याचा दावाही सुत्रांनी फेटाळून लावला आहे.
अद्यापही अशा काही लिंक आहेत, ज्यांचा तापस करण्याची गरज आहे. तसंच एजेन्सी इलेक्ट्रॉनिक डेटाचाही अभ्यास करत आहे, जो या प्रकारणात अनेकांच्या मोबाईलवरून मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीने ड्रग्जसंबंधी दोन गुन्हे दाखल केले होते. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
एनसीबीने या प्रकरणात सारा अली खान, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, श्रद्धा कपूरसह अनेकांची चौकशी केली होती. एनसीबीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची केस होती घेतली होती. ईडीने रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवरून मिळालेले चॅट आणि इतर माहिती एनसीबीसोबत शेअर केली होती.
चॅटमध्ये ड्रग्जसंबंधी, त्याच्या वापराविषयी अनेक मोठी नाव समोर आली होती. दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, सुशांतची माजी मॅनेजर जयंती साहा सारख्या इतर काही लोकांचीही नावं समोर आली होती. एनसीबीकडून आरोपपत्र दाखल झाल्यास या प्रकरणी आणखी काही गोष्टींचा खुलासा होऊ शकतो.