बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; जिल्ह्यात आज केवळ ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

10 Feb :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत रोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टाळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज बुधवारी 587 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 562 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज केवळ 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अंबाजोगाई-3, आष्टी-7,बीड-6, परळी-2, शिरूर -1 तर पाटोदा येथे 6 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.