क्रीडा

पराभवानंतर विराट म्हणतो, माझ्याकडे एक असा संघ आहे जो आपल्या पराभवाचा स्विकार करतो

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 227 धावांनी पराभव

9 Feb :- पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत विजय मिळवला आहे. इंग्लंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, या पराभवासाठी आमच्याकडे कोणतंच कारण नाही. तसेच पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, माझ्याकडे एक असा संघ आहे जो आपल्या पराभवाचा स्विकार करतो आणि पराभवातून शिकतो.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

चेन्नई कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, “कोणतंच कारण नाही. आम्ही एक अशी टीम आहोत, जी आपला पराभव मान्य करते आणि त्यातून शिकते. एक गोष्ट तर ठरलेली आहे की, आता पुढील तीन सामने आणखी आव्हानात्मक असणार आहेत. ते आम्हाला अशाप्रकारे गमावता येणार नाहीत. त्यामुळे पढील सामन्यांसाठी आम्हाला खेळपट्टीचा अभ्यास करावा लागेल आणि गोलंदाज काय करणार आहेत, हे देखील जाणून घ्यावं लागेल. आम्हाला माहित आहे की, कसं वापसी करायची आहे. पुढील सामन्यांमध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरु आणि पूर्ण प्रयत्न करु”

विराट बोलताना म्हणाला की, “विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी आपल्या गोलंदाजी युनिटची आवश्यकता आहे. परंतु, आम्हाला ते या सामन्यात शक्य झालं नाही. आम्ही आमची धोरणे नीट अंमलात आणू शकलो नाही. परंतु आपल्यासाठी योग्य मानसिकता असणे महत्वाचे आहे.” कर्णधार विराट कोहली बोलताना म्हणाला की, “या सामन्यात संघाची देहबोली ठीक नव्हती आणि त्याचवेळी संघ आक्रमकताही दाखवू शकला नाही.” पुढे बोलताना कोहली म्हणाला की, “आपली देहबोली ठीक नव्हती आणि आक्रमकतेचाही अभाव होता. दुसऱ्या डावात आम्ही काही प्रमाणात व्यवस्थित होतो. सुरुवातीचे चार फलंदाज वगळता आम्ही पहिल्या डावाच्या दुसऱ्या भागांत व्यवस्थित खेळलो. फलंदाजीत आम्ही पहिल्या डावात व्यवस्थित खेळलो. पण आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तसेच लवकरात लवकर यामध्ये सुधारणा कराव्या लागतील.”