News

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी व अंबेजोगाई तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्या गठीत

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी व अंबेजोगाई तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्या गठीत
जाभाऊ पौळ परळीत तर अंबाजोगाईच्या समिती अध्यक्ष पदी सुधाकर माले यांची नियुक्ती
परळी -: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी व अंबेजोगाई तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत केली असून रामेवाडी ता. परळी येथील राजेभाऊ पौळ यांची परळी तालुका समितीच्या अध्यक्षपदी तर साळुंकवाडी ता. अंबेजोगाई येथील सुधाकर माले यांची अंबेजोगाई तालुका समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तालुका स्तरातून नागरिकांच्या सदर योजनांच्या बाबतीतील मागण्या व प्रस्ताव याबाबत स्थानिकच्या सामाजिक क्षेत्रातील अशासकीय सदस्यांची समिती गठीत केली जाते.
सदर समितीसाठी ना. धनंजय मुंडे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे नियुक्त्या परळी तालुका पुढीलप्रमाणे : राजेभाऊ पौळ, रामेवाडी -अध्यक्ष,  अमोल कानडे, परळी – सदस्य, श्रीमती ज्योती रमेश चौंडे, परळी – सदस्य, दशरथ तांदळे, सारडगाव – सदस्य, श्रीमती संगीता इंद्रजीत होळंबे, हेळंब – सदस्य, सूर्यकांत मुंडे, कण्हेरवाडी – सदस्य, साजन लोहिया, परळी – सदस्य, नितीन कुलकर्णी, परळी –  सदस्य, अशोक दिघोळे, माळहीवरा – सदस्य, लालाखान करिम खान पठाण तसेच मा. गटविकास अधिकारी परळी हे शासकीय सदस्य तर संजय गांधी निराधार योजना कक्ष तहसीलदार, बीड हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
तर अंबेजोगाई तालुक्याची समिती पुढीलप्रमाणे : साळुंकवाडी ता. अंबेजोगाई येथिल सुधाकर माले – अध्यक्ष, दत्ता सरवदे, अंबाजोगाई – सदस्य, श्रीमती बालिका अशोक गाढवे, अंबेजोगाई – सदस्य, सुधाकर शिनगारे, बरदापुर – सदस्य, बबन मुंडे, मुरकूटवाडी – सदस्य, अरुण जगताप, मुडेगाव – सदस्य, सतीश गंगणे, राडी – सदस्य, महादेव वाकडे, पट्टीवडगाव – सदस्य, राणाप्रताप चव्हाण, अंबेजोगाई – सदस्य, हाश्मी सय्यद गौस, सायगाव – सदस्य तसेच मा. गटविकास अधिकारी अंबेजोगाई हे शासकीय सदस्य व संजय गांधी निराधार योजना तहसीलदार बीड, हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
राजाभाऊ पौळ हे  परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून या निवडीबद्दल त्यांनी तसेच माले व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले असून या समितीच्या माध्यमातून खऱ्या गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू अशी ग्वाही दिली आहे