सिनेमा,मनोरंजन

जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

9 Feb :- कपूर कुटुंबामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राजीव कपूर त्यांच्या राम तेरी गंगा मैली, एक जान एक हम, आसमान, लव्हर बॉय, जबरदस्त, हम तो चले परदेस, या हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या सिनेमातुन प्रेक्षकांच्या मनावर आणि रुपेरी पडद्यावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनते राजीव कपूर यांनी आज मुंबईतील चेंबूरमध्ये इंलॅक्स इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. जिम्मेदारया सिनेमात ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर राजीव कपूर यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शिन आणि निर्मितीकडे वळवला होता. ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा प्रेमग्रंथ हा सिनेमा देखील त्यांनी दिग्दर्शित केला होता.

वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूरमधील इनलॅक्स या रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नीतू कपूर यांनी देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. कपूर कुटुंबातील आणखी एक तारा आज बॉलिवूडने गमावला आहे, सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.