बीड कोरोना ब्रेकिंग; चाचण्या अभावी आज रुगसंख्या कमी!
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
8 Feb :- बीड जिल्ह्यात अधून मधून कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोना चाचण्यांची संख्या वाढली रुग्णसंख्या वाढत आहे तर कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली की रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज सोमवारी 308 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 290 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज केवळ 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अंबाजोगाई-6, बीड-4, परळी-, धारूर-4, तर शिरूर येथे 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.